
पावसामुळे तालुक्यात बीज गायब झाली आहे. मे महिन्यात तब्बल पाच दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेती, फळबागा आणि जनजीवन पावर परिणाम झाला आहे. आज दिवसभरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली असून काही गावांचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. शेतात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य दिसत आहे. खासकरून फळबागांना मोठा तडाखा बसला असून जवळा, हळगाव, पिंपरखेड, फक्राबाद, मतेवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे लिंबोणीच्या झाडे उन्मळून पडली आहेत.यामुळे बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
कांदा उत्पादकांनाही या पावसाचा फटका बसला आहे.चौंडी गावात अक्षय सत्यवान सोनवणे यांच्या चालू असलेल्या घरकुलाच्या बांधकामाची भिंत कोसळली. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी शासकीय मदतीची मागणी केली आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.