
उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले
पुणे : वैशाली हगवणे प्रकरणात आपली उगाच बदनामी केली जात आहे. कुणाच्या लग्नाला जाणे ही माझी चूक आहे का? उगाच बदनामी करताय. माझी चूक असेल तर फासावर लटकवा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी आपला संताप व्यक्त केला आहे.
वैशाली हगवणे च्या लग्नामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार फॉरच्युनर गाडीची चावी देतानाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यानंतर अजित पवारांवर निशाणा साधला. या प्रकरणात अजित पवार यांच्या वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नातील उपस्थितीवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले.त्यानंतर त्यांनी तब्बल सहा दिवसांनतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली
पवार म्हणाले, तुम्ही घरचे लोक आहात मी सांगतो, तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलावता. शक्य असेल तेवढे यायचा मी प्रयत्न करतो, त्या भागात असेन तर उशिरा का होईना. मी लग्नाला हजेरी लावतो. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, आणि त्यांनी नंतर त्यांच्या सुनेला काही वेडवाकडे केले, त्रास दिला तर तिथे माझा काय संबंध?, त्यांना मी सांगितलं का असं कर म्हणून?
मी लग्नाला गेलो, गाडीची चावी द्यायला सांगितली होती. मी देताना विचारलंही होतं. पण त्यांनी सुनेसोबत वाईट वर्तन केले तर माझा काय दोष?, आता कुणाच्या लग्नाला नाही गेलो तर अशी आफत येते. त्यामुळे कुणी लग्नाला न आल्याने नाराज होऊ नये. नालायक लोक माझ्या पक्षात नसतात. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. फरार आरोपींसाठी पोलिसांची तीन विशेष पोलीस पथके त्यांच्या शोधासाठी रवाना केली आहेत. जिथे असेल तिथून मुसक्या घालून आणा, असा स्पष्ट आदेश माझ्या जवळचा असला तरी मी सांगेन, टायरमध्ये टाका. असली माणसे माझ्या पक्षात नकोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवनवे खुलास होत असून माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष असल्याचे समोर येत आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजेंद्र हगवणे यांच्यावर बडतर्फची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.