
मुंबई(सुशील परब): गुजरात टायटन्स सध्या भलताच फॉर्मात असून ते गुणतालिकेत नंबर वनवर आहे. सध्या त्यांचे १२ सामन्यांत १८ गुण आहेत. त्याचप्रमाणे गुजरात टायटन्स लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवून अजून गुण वाढविण्यासाठी प्रयत्न करेल. लखनऊ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर असला तरी फक्त गुजरात टायटन्सचा विजय रोखण्याचा प्रयत्न करतील.
मागील सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली विरुद्ध एकही गडी न गमावता २०० धावांचा पाठलाग करत आयपीएलमध्ये रेकॉर्ड तयार केला. साई सुदर्शनच्या १०८, तर शुभमन गिलच्या ९३ धावांनी आणि उत्तम फलंदाजीच्या जोरावर त्यांनी सहज विजय मिळविला. रदरफोर्ड, जोस बटलर, शाहरूख खान, राहुल तेवाटिया असे फलंदाज त्यांच्याकडे असून जोस बटलर हा उत्तम खेळी खेळत आहे. तसेच गोलंदाजीत रशीद खान, हर्षद खान, प्रसिध कृष्ण, मोहम्मद सिराज असे गोलंदाज आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सची फलंदाजी मिचेल मार्श, एडन मार्क्रम, निकालस पुरन, ऋषभ पंत, आयुष बडोनी यांच्यावर अवलंबून आहे, तर शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्ण, रवी विष्णोई, आवेश खान, आकाशदीप असे गोलंदाज संघात आहेत. चला तर पाहुया गुजरात टायटन्स लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवणार की, लखनऊ सुपर जायंट्स गुजरात टायटन्सला रोखणार?