Thursday, May 22, 2025

विदेशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Greece Earthquake | ग्रीसमधील क्रेट बेटावर ६.१ तीव्रतेचा भूकंप!

Greece Earthquake | ग्रीसमधील क्रेट बेटावर ६.१ तीव्रतेचा भूकंप!

युरोपात त्सुनामीचा धोका


एथेंस : ग्रीसमधील क्रेट बेट परिसरात गुरुवारी पहाटे ६.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला आहे. हा भूकंप क्रेटची राजधानी हेरक्लिओनपासून ८२ किमी ईशान्येला, समुद्रतळाखाली ६८ किमी खोल झाला. भूकंपाची तीव्रता मोठी असूनही कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.



जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसने युरोपीय देशांत त्सुनामीचा संभाव्य धोका व्यक्त केला आहे. ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्यावरील कासोस बेटाजवळ आठवडाभरात दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. ग्रीस हे युरोपमधील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक असून येथे वारंवार भूकंप जाणवतात. जानेवारी महिन्याच्या अखेरीस सँटोरिनी, अमोर्गोस, आयोस आणि अनाफी या बेटांवर हजारो सौम्य तीव्रतेचे भूकंप नोंदवले गेले होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सँटोरिनीसह काही बेटांवरील शाळा तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. ग्रीस हा युरोपातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांपैकी एक मानला जातो.



आठवड्यातील दुसरा भूकंप


ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्यावरील कासोस बेटाजवळ एका आठवड्यापूर्वी ६.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती. त्यानंतर आठ्वड्यामधील दुसऱ्यांदा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे हादरे पूर्व भूमध्य समुद्राच्या काही भागांतही जाणवले. पण कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Comments
Add Comment