Chidiya Trailer : 'चिडिया' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च!

  75

मुंबई : राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला "चिडिया" हा चित्रपट येत्या ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटातून एक हृदयस्पर्शी गोष्ट आपल्याला पहायला मिळणार आहे.


की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत चिडिया या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्मायली फिल्म्स यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर मेहरान अमरोही यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात विनय पाठक अमृता सुभाष, श्रेयस तळपदे, इनामूल हक, ब्रिजेंद्र काळा यांच्या उत्कृष्ट बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत शैलेंद्र बर्वे, संकलन मोहित टाकळकर, कलादिग्दर्शन प्रितेश खुशवाह यांचे आहे, तर वितरण रिलायन्स एंटरटेनमेंट करत आहे.



दोन भावांची हृदयस्पर्शी गोष्ट!


मुंबईतील चाळीतील घरात राहणाऱ्या शानू आणि बुआ या दोन उत्साही भावांची हृदयस्पर्शी गोष्ट आहे. केवळ कल्पनाशक्ती, त्यांची आई आणि समाजातील लोकांच्या मदतीने ते त्यांच्या परिस्थितीपेक्षा खूप मोठ्या स्वप्नाचा पाठलाग कसा करतात? मुले त्यांची स्वप्ने जिवंत ठेवण्यासाठी ज्या अदृश्य लढाया लढतात त्याची एक रंजक गोष्ट या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.



चिडिया चित्रपटानं या पूर्वीच जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली आहे, चेक रिपब्लिक (झ्लिन आयएफएफ), द नेदरलँड्स (सिनीकिड), द यूएसए (एसएआयएफएफ), रशिया (स्पिरिट ऑफ फायर आयएफएफ), इराण (मुलांसाठी आणि प्रौढांसाठी आयएफएफ) अशा अनेक देशांतील प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटाविषयी दिग्दर्शक मेहरान अमरोही म्हणाले, 'चिडिया' हे बालपणाला लिहिलेल प्रेमपत्र आहे. हा चित्रपट उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहण्याविषयी आहे. आपल्या आशा-आकांक्षा कधीही जुन्या होत नाही याची हा चित्रपट शांतपणे आठवण करून देतो.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल