
शेतमालाची आवक वाढली : साहेबराव रोहोम
कोपरगाव : येथील कृषि उत्प़न्ऩ बाजार समिती मध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ५०० कोटीचे वर आर्थिक उलाढाल झाली असुन, बाजार समितीला ५१ कोटीचे उत्प़न्ऩ झालेले आहे. बाजार समितीच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. आजवरच्या वाटचालीत विक्रमी उत्प़न्ऩ व नफा झालेला आहे. माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे, विवेक कोल्हे तसेच राजेश परजणे, नितीन औताडे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे यांचे अधिपत्याखाली संचालक कार्यरत असुन ते शेतकरी हित लक्षात घेऊन शेतकरी बांधवांना सर्व सुविधा उपलब्ध़ करुन देण्यासाठी सदैव तत्प़र आहेत.
बाजार समितीच्या मुख्य़ मार्केट मध्ये व उपबाजार आवार तिळवणी येथे शेतक-यांचे शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी बांधव इतरत्र न जाता येथेच आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. कोपरगांव तालुक्याबरोबरच शेजारील वैजापुर, राहाता, येवला, श्रीरामपुर व सिन्ऩर या तालुक्यातील शेतकरी बाजार समितीत शेतमाल विक्रीस आणतात.सन २०२४-२५ या वर्षात २१ लाख क्विंटल आवक झालेली आहे.तसेच उपबाजार आवार मोर्विस धामोरी फाटा या ठिकाणी लवकरच कांदा व भुसार लिलाव सुरू होणार असुन संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व काटकसरी पध्दतीने सुरू असुन शेतकरी, व्यापारी व सर्व बाजार घटकांसाठी जास्तीत जास्त़ सुविधा उपलब्ध़ करून देणार आहे. भाजीपाला मार्केट येथे बाजार समितीने ११० × ५० साईजचे शेतकरी भाजीपाला लिलावाकरीता सेल हॉल बांधकाम पुर्ण केलेले असुन भाजीपाला धुण्यासाठी ओटा, पाणी व्यवस्था, टॉयलेट ब्लॉक व लाईट सुविधा केलेली आहे.जनावरे बाजार येथे बाजार समितीने टॉयलेट, पाणी आहाळ -४, जनावरे चढ उतार करण्यासाठी धक्का, जनावरे बांधण्यासाठी दावणी तसेच पार्किंग परिसर मुरूमीकरण केला आहे. जनावरे बांधण्यासाठी शेड व्यवस्था व शेतकरी, व्यापारी यांचेसाठी जारव्दारे पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली आहे. तेथील रस्ता डांबरीकरण करणेचे काम मंजुर असुन ते सुरू होणार आहे.
बाहेरील राज्यातील व स्थानिक व्यापारी यांचे स्प़र्धेतुन शेतक-यांच्या शेतमालाला वाजवी किंमत मिळते तसेच चोख वजनमाप, काटला नाही, रोख पेमेंट यामुळे बाजार समितीवर शेतक-यांचा विश्वास असल्यामुळे बाजार समितीमध्ये आवक मोठया प्रमाणात होत आहे. शेतक-यांनी आपला शेतमाल कोपरगांव बाजार समिती व उपबाजार आवार तिळवणी येथे विक्रीस आणुन आपला फायदा करुन घ्यावा असे आवाहन सचिव एन.एस.रणशूर यांनी केले आहे.