
पुणे : राज्याला हादरवून सोडणारी आणखी एक हुंडाबळीची घटना पुण्यात घडली आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे दिनांक १६ मे रोजी वैष्णवी शशांक हगवणे या विवाहितेचा बळी गेला. राजकीय नेता असलेल्या राजेंद्र हगवणे याची सून असलेल्या वैष्णवीचा सासरी हुंड्यासाठी छळ होत असल्याचे समोर आले आहे. या घटनेच्या तीन दिवसानंतर म्हणजे १९ मे २०२५ रोजी दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी या २२ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लग्नामध्ये मानपान व्यवस्थित केला नाही. मनासारखा हुंडा दिला नाही. यामुळे दीपाच्या सासरच्या लोकांनी अतोनात छळ केला. यामुळेच अंगावरची हळद निघण्याआधी या नवविवाहितेने आपले जीवन संपवले.
गेल्या महिन्यात दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी दीपा ऊर्फ देवकी या २२ वर्षीय तरुणीचा प्रसाद चंद्रकांत पुजारी याच्याशी विवाह झाला होता. दोन्ही कुटुंब मूळ कर्नाटक राज्यातील आहेत. त्यामुळं विजयपूरमधील बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला.

पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
लग्नामध्ये मुलीकडच्यांनी हुंडा म्हणून प्रसाद पुजारीला चार तोळे सोने दिलं. मानपानाप्रमाणे १० लाख रुपये खर्चुन लग्न केलं. त्यानंतर दीपा सासरी म्हणजे पुण्यातील सातववाडीतील घरी आली. नव्याचे नऊ दिवस संपताच पती प्रसाद व त्याची आई सुरेखा यांनी दीपाला त्रास द्यायला सुरुवात केली. भांडीकुंडी, फ्रीज दिले नाहीत. योग्य मानपान केला नाही, असे म्हणत ते सतत शिवीगाळ करू लागले. त्रासलेल्या दीपानं वडिलांना फोन करून याबाबत सांगितलं. या घटनेनंतर दीपाचा भाऊ पुण्यात आला आणि बहिणीला माहेरी घेऊन गेला. त्यानंतर सासरे चंद्रकांत पुजारी हे विजयपूरमधील दीपाच्या माहेरी म्हणजे चाबनुर गावी गेले. आम्ही समजावून सांगतो, असं सांगून सुनेला नांदविण्यासाठी पुण्यात घेऊन आले.

पुणे : पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २४ वर्षांच्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी ...
काही दिवसांनी म्हणजे १८ मे २०२५ रोजी दीपाने वडिलांना कॉल केला व ती ढसाढसा रडू लागली. मला कसल्या घरात दिलं, असं वडिलांना विचारू लागली. लग्नात भांडी दिली नाही म्हणून सासरी छळ करून मारहाण होतं असल्याचं तिनं वडिलांना सांगितलं. पित्यानं लेकीला मायेचा आधार दिला. समजूत काढली. थांब काही दिवसात पुण्यात येतो आणि वाद मिटवतो असं तिला समजावलं. पण दुर्दैवानं वाद मिटविण्याची वेळ वडिलांवर आली नाही. दुसऱ्या दिवशी १९ मे २०२५ रोजी दीपा हिनं सातववाडीतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
अवघ्या एका महिन्यात नवविवाहितेने हुंड्यासाठी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. दीपाचे ५३ वर्षीय वडील गुरुसंगप्पा दंडाप्पागौंडा म्यागेरी यांनी हडपसर पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, दीर प्रसन्ना चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी व सासरे चंद्रकांत पुजारी (सर्व रा. परमानंद बिल्डिंग, सातववाडी, हडपसर, मूळ रा. निंबाळ, ता. इंडी, जि. विजयपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.