Thursday, May 22, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजक्राईम

शेवगावात एका पक्षाच्या नेत्यावर अखेर अत्याचाराचा गुन्हा दाखल!

शेवगावात एका पक्षाच्या नेत्यावर अखेर अत्याचाराचा गुन्हा दाखल!

शेवगाव : एका पक्षाच्या राज्य स्तरावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात, मतिमंद पीडितेच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरुन अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, विनयभंग तसेच अत्याचार अशा विविध कलमान्वये येथील उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरचा प्रकार शनिवार दिनांक १० मे रोजी घडला होता. या प्रकरणी पिडीत मुलीच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, सदर इसमाने पीडितेच्या घरात घुसून मतिमंद मुलीला तुझ्याशी लग्न करतो. आपण पळून जाऊ, असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिचा विनयभंग केला आहे. त्यानुसार संबंधितावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.



दरम्यान शुक्रवारी व शनिवारी दिनांक १५ व १६ ला संबंधित पीडित मुलीची अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली असून त्यानंतर मंगळवारी दिनांक २० मेला फिर्यादीच्या पुरवणी जबाबात आरोपीने पीडितेस जबरदस्तीने शरीरसंबंध केले असल्याचे नमुद केले असल्याचे तसेच ती शारिरीक व मानसिक विकलांग असल्याचे नमुद केले आहे.


त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे आदेशानुसार वाढीव कलम लावत, संबंधितावर अखेर या प्रकरणी अनु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व विनयभंगाचा तसेच अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या संदर्भात पीडितेसह संबंधिताचे इन कॅमेरा जाब जबाब घेण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील करत आहेत.

Comments
Add Comment