
नसतं चहाचं नाव काढलं तरी तो घेण्याची तल्लफ होते. काही चहाप्रेमी तर या पेयाला भावनेशी जोडतात... ‘‘चहा हे फक्त एक पेय नाही...चहा ही एक भावना आहे...’’ असे त्यांचे म्हणणे असतं. त्याचा मथितार्थ हाच की....चहा सोडू अन टाळूही शकत नाही.
पावसाळा सुरू व्हायला वेळ आहे. पण अवकाळी सरींची मस्त बरसात सुरू आहे. त्यामुळं उन्हाळयात पावसाळी वातावरणाचा फील अनुभवायला मिळतोय. मग, 'चहा'टळ आठवणारच. त्यात आज आंतरराष्ट्रीय चहा दिन. जगात असा एकही देश नाही जिथं चहा घेतला जात नाही. बहुतांश लोक दुधाचा चहा पसंत करतात.
जगात सर्वात जास्त चहा पिणारा देश चीन. काहीं जणांच्या दिवसाची सुरुवात न्यूज पेपर आणि वाफाळलेल्या मस्त...मस्त चहाने होते. तुम्ही कुणाकडे गेल्यावर आदरातिथ्य झालं की पहिला प्रश्न चहा घेणार का? हाच असतो. या चहाचे अनेक दुष्परिणाम लोकांसमोर आलेले आहेत. तरीही कोट्यवधी भारतीयांच्या जीवनातील चहा हा कायमस्वरुपी घटक बनलाय.

ऑपरेशन आसामद्वारे पाकिस्तानला दणका पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या १२ गद्दारांना बेड्या ठोकल्यानंतरही गुप्तचर खातं शांत बसलेलं नाहीय. कोणत्या ना ...
एका सर्वेक्षणानुसार,
भारतात ग्रामीण भागापेक्षा शहरात अधिक चहा पिला जातो.
दक्षिण भारतात पेक्षा उत्तर भारतात जास्त चहा घेतला जातो.
सर्वाधिक चहा पिणाऱ्या राज्यात आपला महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे.
पहिला गुजरात, दुसरा गोवा आणि तिसरा क्रमांक हरियाणा राज्याचा आहे.