
मुंबई : आज पासून ११ वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित होते. मात्र महाराष्ट्रशासनाची वेबसाईट बंद पडली आहे. आज ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु होणार होते. परंतू सरकारची बेवसाईट अंडर कन्स्ट्रक्शन असल्याचा संदेश या वेबसाईटवर येत आहे त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले आहे.
ऑनलाईन प्रवेशाची लिंक २८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता बंद होईल असे या बेवसाईटवर म्हटले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ एक आठवड्याचा वेळ आहे. अशात पहिल्याच दिवशी सरकारी वेबसाईट ठप्प झाली आहे.
विद्यार्थी किमान एक आणि जास्तीत जास्त दहा कनिष्ठ महाविद्यालयांसाठी त्यांची पसंती देऊ शकतात. दहावी बोर्डानुसार यंदा महाराष्ट्र एफवायजेसी प्रवेशसाठी एकूण ९,२८१ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील २० लाखांहून अधिक जागांसाठी अर्ज येणार आहेत.