Wednesday, May 21, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीठाणे

ठाणेकरांनो येथे लक्ष द्या!  कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणी पुरवठा गुरूवारपासून शुक्रवारपर्यंत बंद राहणार

ठाणेकरांनो येथे लक्ष द्या!  कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणी पुरवठा गुरूवारपासून शुक्रवारपर्यंत बंद राहणार

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, अत्यंत महत्त्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने गुरूवार, २२ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार, २३ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहील.


परिणामी, गुरूवार, २२ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार, २३ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत दिवा, मुंब्रा, कळवा या प्रभाग समितीतील सर्व भाग, तसेच, वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसन नगर नं २, नेहरू नगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा पूर्ण बंद राहील.


तसेच, शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा. तसेच, काटकसरीने पाणी वापरून अपव्यय टाळावा असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Comments
Add Comment