MI vs DC, IPL 2025: मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना करो वा मरो

मुंबई(सुशील परब): वानखेडे स्टेडीयमवर आज मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये सामना होणार आहे. दोघांसाठीही हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून दोन्ही दो संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. मुंबई इंडियन्सचे १२ सामन्यांत १४ गुण झाले आहे, तर दिल्ली कॅपीटल्सचे १२ सामन्यांत १३ गुण झाले आहेत. तसेच मुंबई इंडियन्स जिंकली, तर क्वालीफाय होईल आणि हरली, तर शेवटच्या सामन्यावर अवलंबून राहावे लागेल.


मुंबईची फलंदाजी उत्तम असून रोहीत शर्मा, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, विल जॅक्स, तिलक वर्मा, नमन धीर, कर्णधार हार्दिक पंड्या असे चांगले फलंदाज आहेत. त्यांना जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील व मोठ्या खेळ्या कराव्या लागतील. गोलंदाजीत जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा, मायकल सँटनर, असे गोलंदाज आहेत.


जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट यांनी गुजरात विरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या षटकात १५ धावा करून गुजरात विजयी झाली होती. अशा चुका मुंबईला टाळाव्या लागतील. त्याचप्रमाणे सर्वच गोलंदाजाना चांगली कामगीरी करावी लागेल. दिल्ली कॅपिटल्सही जिंकण्याचा प्रयत्न करेल. के. एल. राहुल, करुन नायर, डुप्लेसीस, अभिषेक पोरेल, कर्णधार अक्षर पटेल, असे फलंदाज आहेत, तर गोलंदाजीत नटराजन, कुलदीप यादव, मुकेश कुमार, मिस्तफिजुर रहमान असे चांगले गोलंदाज आहेत. मागील सामन्यात के. एल राहुलचे शतक होऊनही दिल्ली गुजरात विरुद्ध हरली होती.


दिल्लीची गोलंदाजीही चांगली झाली नव्हती. तसेच के. एल राहुल विरुद्ध बुमराह असा सामना पाहणे रंजक ठरणार असून त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याचप्रमाणे मुंबईचे वातावरण पाहता पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसामुळे एक-एक गुण मिळाला, तर पात्रता फेरी गाठणे दोन्ही संघाना अवघड होईल. पाहुया आजच्या 'करो या मरो' सामन्यात मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपीटल्स कोण बाजी मारते.

Comments
Add Comment

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण

IND vs SA 1st Test : बुमराहचा 'डबल धमाका'! दक्षिण आफ्रिकेचे टॉप ३ फलंदाज तंबूत; जसप्रीत बुमराहच्या हाती २ महत्त्वाच्या विकेट्स!

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेचा पहिला सामना

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला कसोटी सामना, भारत गोलंदाजी करणार

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज कोलकात्यातील ईडन गार्डन्समध्ये

'इडन गार्डन्स' वर आजपासून द.आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी !

पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निश्चित ; शुभमनने दिले संकेत मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात