MI vs DC, IPL 2025: दिल्लीला ५९ धावांनी हरवत मुंबई दिमाखात प्लेऑफमध्ये

  100

मुंबई: इंडियन प्रीमीयर लीगच्या वानखेडेवरील सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५९ धावांनी जबरदस्त विजय मिळवत अतिशय दिमाखात मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यांनी दिल्लीला ५९ धावांनी हरवले. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या संघाला केवळ १२१ धावाच करता आल्या. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे.


अक्षर पटेल आजारी असल्याने तो या सामन्यात खेळला नाही. त्याच्या जागी फाफ डू प्लेसिसने नेतृत्व केले. मुंबईच्या गोलंदाजांनी अक्षऱश: कहर केला आणि दिल्लीच्या फलंदाजीचे कंबरडे तोडले. जसप्रीत बुमराह आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेत मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या मुंबईची सुरूवात शानदार राहिली. रोहित शर्मा आणि रेयान रिकल्ट यांनी तडाखेबंद अंदाजात फलंदाजी केली. मात्र तिसऱ्याच षटकांत मुंबईला पहिला झटका बसला. रोहित शर्मा ५ धावांवर बाद झाला. यानंतर विल जॅक्स आणि रिकेल्टन यांच्यात चांगली भागीदारी झाली. ५ षटकांत संघाची धावसंख्या ४६वर पोहोचली. मात्र सहाव्या षटकांत विल जॅक्सने आपली विकेट गमावली. जॅक्सने २१ धावांची खेळी केली. यानंतर पुढच्याच षटकांत रिकल्टनने कुलदीप यादवला बाद केले.


रिकल्टनने २५ धावा केल्या. यासोबतच कुलदीप यादवने आयपीएलमध्ये १०० विकेट पूर्ण केल्या. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात चांगली भागीदारी झाली. १० षटकानंतर मुंबईची धावसंख्या ३ बाद ८० होती. सूर्यकुमार यादवने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. त्याने ४३ बॉलमध्ये ७३ धावा तडकावल्या. त्याच्यामुळेच मुंबईला १८० धावा करता आल्या. शेवटच्या षटकांमध्ये मुंबईच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. शेवटच्या १० बॉलमध्ये त्यांनी ४३ धावा केल्या. यामुळे मुंबईला ५ बाद १८० धावांपर्यंत मजल मारता आली.


 
Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब