
इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव शिवारामध्ये असलेल्या जिंदाल कंपनीला मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या अग्नी तांडवा मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे . सुमारे चार तासानंतर या आजी वरती काबू आणला गेला असला तरी प्रत्यक्षामध्ये अजूनही ही आग या ठिकाणी दुमसत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीच्या परिसरात काल (मध्यरात्री) दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते. या अग्नि तंडवामुळे परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आजूबाजूच्या गावातील नागरिक या ठिकाणी दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर इगतपुरी चे तहसीलदार, इगतपुरी व वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व इतर सरकारी यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्राची कसून चौकशीही सुरु आहे. दरम्यान ज्योती मल्होत्राची डायरी ...
कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठवलेले होते. याच भागातून आगीची सुरुवात झाली असून पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषद, महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक महापालिकेच्या सिडको मुख्यालय आणि पंचवटी विभागीय कार्यालय येथून अग्निशमन दलाच्या ६ ते ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.
सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीवर सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर काबू आणली गेली नंतर अजूनही ही आग दुमसत असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले असून या ठिकाणी अग्निशमन दलाचे बंब कायम ठेवण्यात आलेले आहेत.आग लागल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहेत.