
मुंबई : आयपीएल २०२५च्या लीग टप्प्यातील उर्वरित ९ सामन्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात मान्सून पूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच कोणतेही उर्वरित सामने पावसामुळे रद्द होऊ नये, यासाठी BCCI कडून एक नवा नियम जारी करण्यात आला आहे. स्पर्धेच्या पुढील सामन्यांसाठी अतिरिक्त २ तासांचा वेळ वाढवण्यात आला. पावसाच्या शक्यतेमुळे हा बदल करण्यात आला.
आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना (१७ मे २०२५) पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर आता बीसीसीआयने निर्णयात बदल केला आहे. यापुढे आयपीएलच्या पुढील सामन्यात पावसाने व्यत्यय आणले तर हा सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त २ तासांचा वेळ वाढवून दिला जाणार आहे. सहसा २ तासांचा अतिरिक्त वेळ नियम फक्त प्लेऑफ सामन्यांसाठी लागू केला जातो. मात्र, आता पावसाच्या शक्यतेमुळे लीग सामन्यांनाही अतिरिक्त वेळेचा नियम लागू करण्यात आला. आयपीएल २०२५ मधील आतापर्यंत ३ सामने पावसामुळे रद्द झाले.

मुंबई: इंडियन प्रीमीयर लीगच्या फायनल सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलचा अंतिम सामना आता नव्या वेळापत्रकानुसार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी ...
सीएसके विरुद्ध आरआर सामन्यानंतर लीग टप्प्यात एकूण ८ सामने शिल्लक राहतील, यातील ७ सामने संध्याकाळी खेळवले जातील. नियमांनुसार, दुपारी खेळला जाणारा सामना संध्याकाळी ६:५० वाजता संपला पाहिजे. तर संध्याकाळी सुरू होणारा सामना रात्री १०:५० वाजता संपला पाहिजे. नवीन नियमांनुसार, दुपारी सुरू होणारा सामना संध्याकाळी ५:३० वाजता सुरू झाला तर एकही षटक कापले जाणार नाही. संध्याकाळी होणारा सामना रात्री ९:३० सुरू झाल्यास सामना एकही षटक कापले जाणार नाही.