
यातील बरेच जण वाहन डीलरशिपला भेटण्यापूर्वीच क्रमांक सुरक्षित करण्यासाठी मोठी रक्कम देण्यास तयार असतात. फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी परिवहन संकेतस्थळावर जाऊन मोबाइल आणि ई-मेलच्या मदतीने ओटीपी मिळवून रजिस्ट्रेशन करावे लागते. एका क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास बहुतेकदा बोली प्रक्रियेद्वारे सर्वाधिक रक्कम देणाऱ्या अर्जदाराला तो क्रमांक दिला जातो.
६ लाख रुपये मोजा
०००१ या क्रमांकासाठी मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये सहा लाख रुपये मोजावे लागत आहेत.