Wednesday, May 21, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ने रचला इतिहास, केली अशी कामगिरी की...

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ने रचला इतिहास, केली अशी कामगिरी की...

मुंबई : १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ने सर्व विक्रम मोडले आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली गेलेली चॅम्पियन्स ट्रॉफी ठरली आहे.


याबाबत आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले की, "आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ने जागतिक स्तरावर विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळवली आहे, ज्यामुळे ती या स्पर्धेची आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली जाणारी आवृत्ती बनली आहे. हे उल्लेखनीय आकडे खेळाचे वाढते जागतिक आकर्षण आणि आमच्या भागीदारीची ताकद दर्शवतात."


आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, प्रति ओव्हर या स्पर्धेला ३०८ दशलक्ष प्रेक्षक मिळाले जे कोणत्याही आयसीसी स्पर्धेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल या स्पर्धेतील सर्वात जास्त पाहिलेला सामना ठरला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत या स्पर्धेचा किताब जिंकला होता. या सामन्याला ज्याला जगभरात ६५.३ अब्ज मिनिटांनी लाईव्ह व्ह्यूइंग मिळाले. या सामन्याने २०१७ च्या फायनलमधील विक्रम ५२.१ टक्क्यांनी मोडला. अशी देखील माहिती आयसीसीने एका निवेदनात दिली आहे.


तर दुसरीकडे या स्पर्धेचा अंतिम सामना जगभरातील सर्वाधिक पाहिलेल्या आयसीसी सामन्यांमध्ये लाईव्ह वॉच टाइमच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारतात, हा सामना आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरी आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील त्याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर, आतापर्यंतचा तिसरा सर्वाधिक पाहिलेला आयसीसी सामना आहे. 2017 च्या तुलनेत एकूण पाहण्याच्या तासांमध्ये ६५ टक्के वाढ झाल्याने ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक पाहिली जाणारी चॅम्पियन्स ट्रॉफी ठरली.


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जागतिक स्तरावर ३६८ अब्ज मिनिटांनी पाहिले गेले जे २०१७ मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपेक्षा १९ टक्क्क्यांनी जास्त आहे.हिंदी भाषेतील फीडची सुरुवात करून सुधारित कव्हरेजसह, अमेझॉन प्राइम व्हिडिओने प्लॅटफॉर्मवर केवळ दाखवल्या जाणाऱ्या कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या सर्वाधिक प्रेक्षकसंख्या पाहिली. तर २०१७ च्या तुलनेत २०२५ च्या पाकिस्तानमधील स्पर्धेसाठी प्रेक्षकांची संख्या २४ टक्क्यांनी वाढली.


---------------

Comments
Add Comment