Thursday, May 22, 2025

देशताज्या घडामोडी

पाकिस्तानच्या आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी

पाकिस्तानच्या आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या आणखी एका अधिकाऱ्याला भारताने "पर्सोना नॉन ग्रेटा" म्हणून घोषित केले आहे. या पाकिस्तानी अधिकाऱ्याला 24 तासात भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भातील माहितीनुसार नवी दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणारा संबंधित पाकिस्तानी अधिकारी त्याच्या अधिकारक्षेत्राबाहेरील इतर संशयास्पद कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले. त्यामुळे भारत सरकारने ही कारवाई केली आहे. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान उच्चायुक्तालयाला एक निवेदन जारी केले आणि त्यांचा भारतातील कोणताही पाकिस्तानी राजदूत किंवा अधिकारी त्यांच्या विशेषाधिकारांचा आणि पदाचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करणार नाही याची खात्री करण्यास सांगितले.

Comments
Add Comment