Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी! उद्या पाणी जपून वापरा, 'या' भागातला पाणीपुरवठा होणार बंद

ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही


ठाणे: ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे बुधवारी (२१ मे) यादिवशी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत १२ तासांसाठी पाणी पुरवठा (Thane Water  Cut)  बंद राहणार आहे.


ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्च दाब उप केंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार दि. २१ मे, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून रात्री ०९.०० वाजेपर्यंत एकूण १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.



या भागातला पाणीपुरवठा होणार बंद


ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील  घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणी पुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील.  त्याचबरोबर, पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल,  या पाणी कपातीच्या कालावधीत, आवश्यक पाणी साठा करून ते पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरांची लाखोंची फसवणूक; नक्की घडलं तरी काय ?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगावकर यांची लाखोंची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे.

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर