अकरावीला प्रवेश घ्यायचाय? कुठं करायचा अर्ज

  52

दहावीचा निकाल लागला आणि आता सर्वांचं लक्ष लागलंय पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडं – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेकडं! कोणती शाखा घ्यावी? कोणते विषय निवडावे? कोणत्या कॉलेजमध्ये अर्ज करावा? आणि तिथं ऍडमिशन मिळेल का? हे सगळे प्रश्न आता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात घोंगावत आहेत…


या पार्श्वभूमीवर अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर झालंय. राज्यभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया २१ मेपासून सुरू होतेय. याच प्रक्रियेमधून राज्यातील सर्व शासकीय, खासगी, अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे. म्हणजेच, योग्य कॉलेज निवडणं, वेळेत अर्ज करणं आणि सर्व टप्पे पूर्ण करणं.. हे आता तुमच्याच हातात आहे!



अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीनं राबविण्यात येतेय. त्यामुळं एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झालाय.



आता कोणत्या शाखेत किती जागा आहेत ते पाहूया..


यंदा विज्ञान शाखेच्या आठ लाख 52 हजार 206 जागा आहेत. वाणिज्य शाखेच्या पाच लाख 40 हजार 312 जागा तर कला शाखेच्या सहा लाख 50 हजार 682 जागा आहेत. राज्यात एकूण 20 लाख 43 हजार 254 जागा उपलब्ध झालेल्या आहेत.



आता प्रवेश घेण्यासाठी वेळापत्रक कसे आहे ते पाहूया..


- यात 21 ते 28 मे दरम्यान प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम नोंदणी करता येईल.
- त्यानंतर 30 मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल.
- मग 30 मे ते 1 जूनदरम्यान हरकती व दुरुस्ती प्रक्रिया असतील .
- 3 जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
- त्यानंतर 5 जूनला गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप केला जाईल.
- अखेर 6 जूनला विद्यार्थाना वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी अधिकृत पोर्टलवर दिसेल. त्यानंतर 6 ते 12 जूनपर्यंत विद्यार्थी आपल्या निवडलेल्या महाविद्यालयामध्ये अ‍ॅडमिशनची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
- 14 जूनला दुसर्‍या फेरीसाठी जागा जाहीर होतील.



आता प्रवेश प्रक्रियासाठी अर्ज कुठे आणि कसा कराल ते जाणून घेऊया.


अकरावीच्या प्रवेशासाठी www.mahafyjcadmissions.in हे स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया 21 मेपासून सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता