
हैद्राबाद : दक्षिणेकडील दोन राज्यांमध्ये येत्या १ जूनपासून थिएटर बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या दोन राज्यांतील थिएटर पूर्ण बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राजस्व मॉडेलच्या माध्यमातून मालकाला अपूरे भाडे मिळत असल्यामुळे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या दोन राज्यांतील सिंगल-स्क्रीन थिएटर बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक्झिबिटर्स असोसिएशनसोबत झालेल्या पहिल्या संयुक्त बैठकीत, प्रदर्शकांनी टक्केवारी-आ धारित मॉडेलमधील बदलाला पाठिंबा दर्शविला. त्यासोबतच औपचारिकपणे थिएटर्स बंद करण्याच्या निर्णयाला सहमती दर्शविली आहे.
प्रदर्शक संघटनेच्या बैठकीत सुमारे ६० प्रदर्शक उपस्थित होते. ज्यात दिल राजू आणि सुरेश बाबू सारख्या फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांचा समावेश होता. याशिवाय, अनेक प्रमुख चित्रपट वितरक आणि निर्मातेही अनुपस्थित होते.
दरम्यान, या प्रस्तावावर इंडस्ट्रीतल्या लोकांमध्येच अंतर्गत मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगाना या दोन्हीही राज्यातील सिंगल स्क्रिन थिएटर्स बंद करण्याच्या निर्णयाला अधिकृत जर मंजूरी मिळाली, तर बड्या सेलिब्रिटींच्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर परिणाम होऊ शकतो.
येत्या, १२ जून रोजी कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ प्रदर्शित होणार आहे. पवन कल्याण यांचा ‘हरि हरा वीरा मल्लू’ हा चित्रपटही रिलीज होणार आहे. सिंगल-स्क्रीन थिएटर्सला आता कदाचित फार मोठ्या वितरणाच्या समस्यांना तोंड देण्याची शक्यता आहे. परंतु मल्टिप्लेक्सला याचा त्रास होणार नाही, ते चित्रपटाची स्क्रिनिंग कायम ठेवू शकता. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दलही प्रदर्शकांनी चिंता व्यक्त केली आहे.
प्रदर्शकांनी विनंती केली आहे की, ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेली आहे, ते चित्रपट लवकर ओटीटीवर रिलीज करु नये अशी विनंती करण्यात आली आहे. फिल्म चेंबरला औपचारिक निवेदन सादर करण्यात येणार असून तोडगा काढण्यासाठी १ जूनच्या आधीच चर्चा अपेक्षित आहे, येत्या काही दिवसांत आता थिएटर्सबाबतीत आणि ओटीटी रिलीज बाबत कोणता निर्णय होतो, हे पाहणं महत्तवाचे ठरणार आहे