
मुंबई(सुशील परब): राजस्थान रॉयल व चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून केव्हाच बाहेर पडले आहेत त्यामुळे ही औपचारिक लढत होणार आहे. हा सामना दिल्ली येथे होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज हा संघ गूणतालिकेत तळाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२५ मध्ये विशेष कामगीरी करू शकला नाही. महेंद्र सिंग धोनी कर्णधार म्हणून या आयपीएल स्पर्धेत काही करामत करू शकला नाही व फलंदाज म्हणून सपशेल अपयशी ठरला त्यामुळे त्याचीही शेवटची स्पर्धा आहे की काय असे वाटते.
चेन्नई सुपर किंंग्जने बारा सामन्यात फक्त तीन विजय मिळविले आहेत, तर राजस्थान रॉयलने तेरा सामन्यात तीन विजय मिळविले आहेत. दोनही संघांची स्थिती सारखीच आहे. कोणीही विजयी ठरला तरी काही फरक नाही फक्त दोन गुण वाढतील. मागील सामन्यात चेन्नईने कोलकत्ताला हरविले होते. सुपर किंग्जमध्ये महेंद्र सिंग धोनी, रचिन रवींद्र, डेवॉन कॉन्वे, शिवम दुबे, विजय शंकर असे फलंदाज आहेत डेवाल्ड ब्रेवीस, शिवम दुबे फलंदाजित चमकले होते. नूर अहमद, रवींद्र जडेजा, रवी अश्विन, सॅम करन, पथिराना असे गोलंदाज आहेत. नूर अहमदने, ४ फलंदाजांना बाद केले होते.
राजस्थान रॉयलमध्ये संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, शेमरॉन हेटमायर, रियान पराग असे चांगले फलंदाज आहेत. तसेच गोलंदाजीत जोफा ऑर्चर, तीक्षणा, हसरंगा, तुशार देशपांडे असे गोलंदाज आहेत. यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, यांनी चांगली सुरुवात करून दिली होती यशस्वी जयस्वालने अर्धशतक झळकावले होते. वैभव सूर्यवंशीने ४० धावा केल्या होत्या. चला पाहूया औपचारिक लढतीत कोण विजयी ठरेल?