
दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ६२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थानने चेन्नईला ६ विकेटनी हरवले. हा राजस्थानचा या हंगामातील शेवटचा सामना होता. वैभव सूर्यवंशीने या सामन्यात अर्धशतक ठोकले. या विजयासह राजस्थानने आयपीएलचा हा शेवट गोड केला.
या सामन्यात चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानसमोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान राजस्थानने १८ षटकांतच पूर्ण केले. वैभव सूर्यवंशीने ५७ धावांची धमाकेदार खेळी केली
पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या चेन्नईची सुरूवात खराब राहिली. दुसऱ्याच षटकांत कॉन्वेला युद्धवीरने बाद केले. यानंतर याच घटकांत उर्विल पटेललाही बाद केले. मात्र यानंतर आयुष म्हात्रेने जबरदस्त फलंदाजी केली. म्हात्रेने २० बॉलमध्ये ४३ धावांची खेळी केली. यानंतर सहाव्या षटकांत त्याची विकेट पडली. यानंतर पुढच्याच षटकांत अश्विनही बाद झाला. अश्विनने १३ धावा केल्या. यानंतर रवींद्र जडेजाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र जडेजाही लवकर बाद झाला. यानंतर ब्रेविस आणि दुबेने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. १० षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ५ बाद १०३ होती. दोघांमध्ये ५९ धावांची भागीदारी झाली. १४व्या षटकांत ब्रेविस ४२ धावा करून बाद झाला. यातच धोनी आणि शिवम दुबेमध्ये चांगली भागीदारी झाली. यातच धोनीने टी-२०मध्ये ३५० षटकारही पूर्ण केले.