Tuesday, May 20, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन महिलांसह दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन महिलांसह दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

कल्याण : कल्याण पूर्वमधील ‘सप्तशृंगी’ या चार मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन महिलांसह एका दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि पालिका यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत आठ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं, मात्र अजूनही काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.



या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. इमारत जुनी असल्याची माहिती समोर आली असून त्याची स्थिती लक्षात घेता इतर रहिवाशांचीही काळजी घेतली जात आहे.


रेस्क्यू ऑपरेशन गेल्या दोन तासांपासून सुरू असून अजूनही मदतकार्य सुरूच आहे.

Comments
Add Comment