
कचरा बनलाय नागरी आरोग्याचा खेळ
कल्याण : कल्याण पूर्वेतील पूना लिंक रोड विजयनगर परिसरातील नतून शाळा, सेंट ज्युडिस शाळे जवळ , प्रसाद हाँटेल, संतोषी माता मंदिर बँकजवळ रस्त्याच्या कडेला कच-याचे ढीग आणि इतस्ततः पसरलेला कचरा संभाव्य रोगराईला करणीभूत ठरेल असे दिसत आहे. तसेच मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा सावळा गोंधळ कारभारात कधी सुधारणा होणार, असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात नतून शाळा, सेंट ज्युडिस शाळा प्रसाद हाँटेल, संतोषी माता मंदिर बँकजवळ परिसरातील रस्त्यालगत कचर्याचे ढीग आणि विखुरलेला कचरा पाहता शहर स्वच्छतेचे तीन तेरा नऊ बारा वाजल्याचे दिसून येत आहे. या कचर्याच्या ढीगा मुळे, दुर्गंधी सुटली असून हा कचरा रोगराईला निमंत्रण देऊ शकतो असे कचर्याच्या भोवती फिरणाऱ्या माशा, डास, यामुळे दिसून येत आहे. हा कचरा परिसरातील लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतो. कल्याण डोंबिवली मनपाच्या घनकचरा व्यस्थापन विभागा मार्फत कचर्याच्या नियोजन शहर स्वच्छतेसाठी केले जाते. एकीकडे कचराकुंडीमुक्त शहर संकल्पना राबिविली जात असून शहारातील अनेक ठिकाणी रस्त्यालगत कचरा टाकणारी प्रवुत्ती वाढत येत असल्याचे दिसून येत आहे. कल्याण पश्चिमेतील बारावे जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या रस्त्यालगत कचर्याचे ढीग नेहमीच दिसून येतात. याच अर्थ घंटागाडी मार्फत संकलन केला जाणरा कचरा संकलनाचे गणित बिघडत असल्याचे असा शहरात विविध रस्त्यालगत कच-याचे ढीग पाहता दिसते.
रस्त्यालगत कच-याचे ढीग आणि अस्वच्छता पाहता संदर्भीत परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवासी, नागरिक यांना तो कचरा आरोग्य पाहता समस्या बनला असल्याचे दिसते. शाळा परिसरातील रस्त्यालगत असणाऱ्या कचरा पाहता विघार्थी आरोग्य प्रश्न निर्माण होऊ शकतो. अवकाळी पावसाने हा कचरा ओलसर झाल्याने कचरा प्रदुषणामुळे संभाव्य साथीचे रोग आल्यास यास जबाबदार कोण?असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. शहर स्वच्छता बाबत सामाजिक बांधलिकीचा वसा जोपसणारी कल्याण पूर्वेतील सहयोग सामाजिक संस्था ही पुढकार घेत प्रशासनाला मदत करीत कचरा टाकला जाणा-या ठिकाणी शिल्प तयार करून जनजागृती करते., याच संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी कल्याण पूर्वेतील संदर्भीत कच-याच्या ढीगाबाबत कळवून देखील प्रशासनाने तो कचरा संकलन करून स्वच्छता केली गेली नाही. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. कालच मोठा गजावजा करीत प्रशासनाने शहर स्वच्छता, रस्ते स्वच्छता , कचरा संकलन करण्यासाठी शहरात 'चेन्नई पॅटर्न' लागू करून शहर स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमला असला तरी रस्त्यालगत कच-याचे विविध ठिकाणी दिसणारे ढीगाला प्रशासन कसा आळा घालणार असे यानिमित्ताने दिसत आहे.