Monday, May 19, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजविडिओ

Rain Radar : आता अतिवृष्टीचा अंदाज पाच तास आधी मिळणार!

Rain Radar : आता अतिवृष्टीचा अंदाज पाच तास आधी मिळणार!

मुंबईत २६ जुलै २००५ ची अतिवृष्टीची रात्र आठवली की काळजाचा ठोका चुकतो. या दिवशी प्रचंड पाऊस झाल्यानं मुंबई शहर पाण्याखाली गेलं होतं. मुंबईत या आधी आणि नंतरही अनेक अतिवृष्टीच्या घटना घडल्या. मात्र २००५ मधली अतिवृष्टीवेळी मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि मृत्यूचे तांडव मुंबईकरांनी पाहिले. हे भयंकर होतं. त्यामुळं संपूर्ण शहर जलमय झालं होतं. यात १५०० नागरिकांचा बळी गेला. अतिवृष्टीचा हवामान विभागाकडून अंदाज लवकर मिळाला तर प्रशासनाला वेळीच उपाय करता येणं शक्य होतं. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवून किंवा अलर्ट करून जीवित हानी टाळता येऊ शकते. हेच आता रडारमुळं शक्य होणार आहे. कारण मुंबई जलमय होण्याच्या किमान पाच ते सहा तास आधी अतिवृष्टीचा अंदाज आपल्याला मिळू शकणार आहे.



मुंबई, पुणे तसेच कोकण भागात होणाऱ्या अतिवृष्टीचा अंदाज येण्यास अनेक अडचणी होत्या. त्या यंदाच्या मान्सून हंगामापासून कमी होण्याची शक्यता आहे. कारण सप्टेंबर २०२४ मध्ये मुंबईतील पनवेल, वसई-विरार, विलेपार्ले आणि कल्याण- डोंबिवली या भागात चार एक्स बॅन्ड रडार बसवले आहेत. ही सर्व रडार मुंबई जलमय होण्याच्या किमान पाच ते सहा तास आधी हा अंदाज देऊ शकतील. काही प्रमाणात पुणे आणि कोकणातील काही भाग हे या रडारच्या कक्षेत असतील. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) मुंबईत एक्स- बँड रडार नेटवर्क स्थापित केली आहेत. त्यामुळं जोरदार पावसाचा अंदाज लवकर मिळण्याची सोय झाली आहे. मुंबईतील १३८ स्टेशनवरचा पाऊस हे रडार नोंदवतील. त्याचा फायदा पुणे शहरासह कोकण विभागाला काही प्रमाणात होईल, असं सांगितलं जातय.



कुठे आहेत हे चार रडार?



  • पनवेल

  • वसई- विरार

  • विलेपार्ले

  • कल्याण- डोंबिवली



कसे काम करणार?


प्रत्येक रडारमधील डेटा एकत्रित केला जाईल, ज्यामुळं मुंबईतील हवामान प्रणालींचा रिअल-टाइम ट्रॅकिंग होईल. मुंबईच्या हवामानाचे बदल आणि त्याचं सततचे रिडिंग मिळेल. रडार नेटवर्क असलेल्या भागात पावसाचं निरीक्षण करेल. त्यानुसार अतिवृष्टीचा अंदाज देणं सोप होणार आहे. मुसळधार पाऊस, वादळ, विजांचा कडकडाट कधी होईल हेही समजण्यास सोपे होईल.

Comments
Add Comment