Marathi Movie in Cannes 2025: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला ‘खालिद का शिवाजी’

Marathi Movie: राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांची पहिलीच मराठी फिचर फिल्म ‘खालिद का शिवाजी’ची कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ (Cannes Film Festival 2025) मधील प्रतिष्ठित ‘मार्शे दु फिल्म’ (Marché du Film) या विभागासाठी निवड झाली आहे.


महाराष्ट्र शासनाच्या फिल्म, थिएटर आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यातर्फे अधिकृत निवड झालेला हा चित्रपट नुकताच जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात झळकला आहे.  राष्ट्रीय पुरस्कार विजेते राज मोरे दिग्दर्शित या चित्रपटात क्रिश मोरे याने खालिदची भूमिका साकारली आहे. यासोबतच अनेक धुरंधर मराठी कलाकारांचा ताफा या चित्रपटात पाहता येणार आहे. ज्यामध्ये प्रियदर्शन जाधव, भरत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलाश वाघमारे आणि स्नेहलता तागडे यांचा समावेश होतो.



‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे कथानक


पाचवीत शिकणाऱ्या खालिद नावाच्या मुलाची ही कथा आहे. खालिदच्या मनात प्रश्न येतात,या प्रश्नांनी भरलेले त्याचे मन अखेर ‘शिवाजी महाराज’ शोधू लागते. या निरागस प्रश्नांमधून उगम पावणारी ही कथा केवळ एका मुलाची नाही, तर आजही अनेक मुलं, व्यक्ती, कुटुंबं ज्या भेदभावाशी झुंज देत आहेत, त्यांची आहे. खालिद एका सत्यशोधकाच्या भूमिकेत जातो आणि त्याच्या नजरेतून शिवाजी महाराजांना, त्यांच्या मूल्यांना, त्यांच्या समतेच्या विचारांना शोधतो. अशी या चित्रपटाची संकल्पना आहे. मायकेल थेवर आणि सुषमा गणवीर निर्मित, या चित्रपटाचे लेखन केलाश वाघमारे यांनी केले असून, संवाद राजकुमार तंगडे यांचे आहेत. तर विजय मिश्रा चित्रपटाचे डिओपी आहेत.



अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मजल


'खालिद का शिवाजी'ची निवड केवळ कान्स महोत्सवात झाली नसून इफ्फी इंडियन पॅनोरमा - एनडीएफसी फिल्म बाजार २०२४(गोवा), अजंठा - एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ - इंडिया फोकस स्पेशल स्क्रीनिंग, फ्रिप्रेसी इंडिया ग्रँड प्रिक्स अवॉर्ड २०२५ मध्ये नामांकनही मिळाले आहे.


राज मोरे यांना आधी 'खिसा'(२०२०) या लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याव्यतिरिक्त 'बिच्छौल्या' या शाहीर लुधियानवी यांच्या कवितेवर आधारित लघुपटासाठी 'एमआयसीएफएफ २०२३'मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मिळाला होता. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राज मोरे म्हणतात, '' ही माझी पहिली फिचर फिल्म असून या चित्रपटावर मी २-३ वर्षं मेहनत घेतली आहे. माझ्या संपूर्ण टीमचे आणि निर्मात्यांचे मी आभार मानतो, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाल्यावर आता राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. ही आनंदाची भावना शब्दांत सांगता येणार नाही. लवकरच हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येऊ.''

Comments
Add Comment

अमिताभ यांची अयोध्येत मालमत्ता खरेदी

अयोध्या : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत मालमत्ता खरेदी केली आहे. त्यांनी ‘हाऊस ऑफ अभिनंदन

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी

अक्षय कुमार–प्रियदर्शन पुन्हा एकत्र; ‘रामजी आके भला करेंगे’ टीझरमध्ये पीक कॉमेडीची झलक

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज मुंबई : भूत बंगला हा २०२६ मधील

लंडन फॅशन वीक २०२६ मध्ये क्रिती सॅनन हिने उधळला ग्लॅमर

लंडन : बॉलिवूडमधील आघाडीची स्टाइल आयकॉन Kriti Sanon हिने पुन्हा एकदा लंडन फॅशन वीकमध्ये आपल्या शानदार उपस्थितीने

अल्लू अर्जुन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘AA22xA6’मध्ये नवी जोडी ठरली चर्चेचा विषय

मुंबई : भारतीय सिनेमात पहिल्यांदाच असा काहीतरी मोठा धमाका घडणार आहे, जो खऱ्या अर्थाने भव्य ठरणार आहे. दीपिका

संजय लीला भन्साळी मागील चार दशकांतले सर्वात महान दिग्दर्शक : रणबीर कपूर

मुंबई : आज संजय लीला भन्साळी यांचा वाढदिवस असल्याने, रणबीर कपूर यांनी या प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शकाला