Career : पशुवैद्यकीय शाखेत करा करिअर! सुंदर, संपन्न आयुष्य जगा

  29

भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीबरोबर पशुपालनालाही तितकंच महत्त्व आहे. या क्षेत्रात एक असा व्यावसायिक आहे, जो मुक्या प्राण्यांच्या आरोग्याचे रक्षण करतो आणि तो म्हणजे पशुवैद्यक. आज आपण जाणून घेणार आहोत, पशुवैद्यकीय शाखेत करिअर करण्यासाठी कोणते टप्पे असतात, काय संधी उपलब्ध आहेत, आणि यामागील भविष्य काय आहे ते जाणून घेऊया या लेखातून...



पशुवैद्यकीय शाखेतील करिअर समजावून घेण्यापूर्वी आपण पशुवैद्यकीय विज्ञान म्हणजे काय हे पाहूयात. पशुवैद्यकीय विज्ञान म्हणजे प्राण्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व गोष्टींचा अभ्यास. यात प्राण्यांच्या रोगांचे निदान, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण, पोषण व्यवस्थापन, तसंच प्रजनन आणि वंश सुधारणा यांचा समावेश होतो. पशुवैद्यकीय शाखेचे अनेक फायदे आहेत. एक तर हे क्षेत्र सतत वाढत आहे. शेती आणि पशुपालन आधारित अर्थव्यवस्थेत पशुवैद्यकांची मागणी वाढत आहे. त्यातच सरकारी नोकऱ्यांपासून ते खासगी प्रॅक्टिसपर्यंत अनेक पर्याय खुले आहेत. दुसरं असं की या करिअरमध्ये पशुप्रेम, समाजसेवा आणि आर्थिक स्थैर्य एकत्र मिळतं.



पशुवैद्यकीय शाखेत प्रवेश कसा घ्यायचा ते पाहूयात


-१२वी सायन्स मधून, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये किमान ५० टक्के गुण पाहिजेत यामध्ये NEET परीक्षा अनिवार्य आहे. NEETच्या गुणांकनाचा अॅडमिशनसाठी वापर होईल. NEET नंतर, विविध राज्यांच्या आणि केंद्र शासनाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बॅचलर ऑफ व्हेटेरीनरी सायन्स आणि अॅमिमल हझबंडरी या साडेपाच वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शास्त्रीय, तांत्रिक आणि व्यावहारिक ज्ञान दिले जाते.



अभ्यासक्रमात कशाचा समावेश असतो ते पाहूयात



  • अ‍ॅनाटॉमी, फिजिऑलॉजी

  • अ‍ॅनिमल न्यूट्रिशन

  • क्लिनिकल मेडिसिन

  • सर्जरी

  • गायनॅकोलॉजी

  • पॅथॉलॉजी

  • फार्माकॉलॉजी

  • फील्ड ट्रेनिंग आणि इंटरनशिप



आता आपण पाहूयात राज्यातील प्रमुख पशुवैद्यकीय महाविद्यालये



  • बॉम्बे पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई

  • पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान महाविद्यालय,परभणी

  • नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर

  • पशुवैद्यकीय व पशु विज्ञान संस्था, अकोला


आता प्रश्न पडला असेल की, पशुवैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर संधी कुठे मिळणार हा. घाबरू नका. पदवी मिळाल्यानंतर सरकारच्या पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी पदांवर भरती होता येतं. तसंच स्वतःचं क्लिनिक उघडून प्राणी उपचार सेवा देता येते. डेअरी आणि पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये तंत्रज्ञ, उत्पादन प्रमुख, आरोग्य सल्लागार म्हणून काम करता येतं. एनजीओ आणि अ‍ॅनिमल वेल्फेअर संस्थेत काम करता येते. शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातही करिअर घडवता येते. इतकंच नव्हे तर फार्मा कंपन्यांमध्येही करिअर करता येतं.


पशुवैद्यकीय शाखेची मागणी भारतापुरती मर्यादित नाही. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युके, अमेरिका इत्यादी देशांमध्येही भारतीय पशुवैद्यकांना मोठ्या संधी आहेत. त्यासाठी टोफेल/आयईएलटीएस आणि काही देशांत अतिरिक्त पात्रता असावी लागते. ज्यांना प्राण्यांप्रती आत्मीयता आहे, सामाजिक बांधिलकी वाटते आणि वैद्यकीय सेवा देण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हे क्षेत्र सर्वोत्तम आहे. पशुवैद्यकीय क्षेत्र म्हणजे केवळ करिअर नाही, तर एक सेवा आहे. आजच्या तरुणांनी या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिल्यास केवळ भविष्य उज्ज्वल होईल असं नाही तर आपली ग्रामीण अर्थव्यवस्थाही सक्षम होईल.

Comments
Add Comment

बँकॉकहून मुंबईला येणारे विमान लँडिंगदरम्यान आदळले! थोडक्यात टळला अपघात

मुंबई: आज मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे, बँकॉकवरुण येणारे हे

बीएमसीच्या ‘पार्किंग’साठी ‘वृक्षतोड’

मुंबई : आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनजवळ आठ झाडे तोडण्याच्या आणि चार इतर झाडांचे स्थलांतर करण्याच्या 'बृहन्मुंबई

गर्भवती बांगलादेशी महिला जेजे रुग्णालयातून फरार, पोलिसांचा शोध सुरू

मुंबई: भारतात बेकायदेशीर वास्तव्यासाठी नवी मुंबई येथून एका २१ वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली होती.

गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या 2500 फेऱ्या

कोकणात गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी गाड्यांचे नियोजन

'शिंदेंना लॉटरी लागली, मुख्यमंत्री झाले, पण टिकवता आली... मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा वाद हा काही राज्याला नवा नाही. मंत्री गणेश नाईक

पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या सुरक्षेची जबाबदारी काही तृतीयपंथीयांवर देण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या