
मुंबई(सुशील परब): आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदरावाद हा सामना लखनऊमध्ये खेळला जाणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे ११ सामन्यांत दहा गुण झाले असून त्यांचे अजून तीन सामने वाकी आहेत. गुणतालिकेत लखनऊ सुपर जायंट्स सातव्या क्रमांकावर व सनरायझर्स हैदराबाद आठव्या क्रमांकावर आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सला तीनही सामने जिंकले, तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा आहे. त्यांना इतरही संघांवर अवलंबून राहावे लागेल. सनरायझर्स हैदरावाद प्लेऑफमधून अगोदरच बाहेर झाली आहे. ते लखनऊ सुपर जायंट्सला हरवण्याचा प्रयत्न करतील. लखनऊ सुपर जायंट्स हा सामना हरले, तर ते पण प्लेऑफमधून बाहेर होतील.
मागील सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादला हरविले होते त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. ऋषभ पंत कर्णधार, निकोलस पुरन, मीचेल मार्श, एडन मार्कम, हे फलंदाजी सांभाळतील शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाशदीप हे गोलंदाजीचा भार सांभाळतील. सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी, अभिषेक शर्मा, ट्रेव्हीस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी हे सांभाळतील, तर कर्णधार पेंट कमिन्स, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, जयदेव उनादकट हे गोलंदाजीचा भार सांभाळतील, तर पाहूया लखनऊ सुपर जायंट्स सनरायझर्स हैदराबादला हरवून प्लेऑफच्या दिशेने घौडदौड करतील का?