
लखनऊ: इंडियन प्रीमियर लीगमधील ६१व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव झाला आहे. विजयासाठी दिलेले २०६ धावांचे आव्हान सनरायजर्स हैदराबादने ६ विकेट राखत पूर्ण केले. लखनऊच्या पराभवामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २०५ धावा केल्या होत्या. हैदराबादसमोर विजयासाठी २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. हैदराबादने हे आव्हान ६ विकेट राखत पूर्ण केले.
पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊच्या मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांनी जबरदस्त सुरूवात करून दिली. मिचेल मार्शन ३९ बॉलमध्ये ६५ धावा ठोकल्या तर एडन मार्करमने ३८ बॉलमध्ये ६१ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची जबरदस्त भागीदारी केली. १०व्या षटकांत मिचेल मार्श बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार ऋषभ पंत पुन्हा अपयशी ठरला. पंतने केवळ ७ धावा केल्या. पंत लवकर बाद झाल्यानंतर निकोलस पूरनने चांगली खेळी करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पूरनने ४५ धावा केल्या. यातच एडन मार्करम ६१ धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकांत लखनऊच्या तीन विकेट पडल्या. अखेरीस लखनऊला २० षटकांत ७ बाद २०५ धावा झाल्या.