Monday, May 19, 2025

विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Joe Biden: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्रोस्टेट कॅन्सर

Joe Biden: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्रोस्टेट कॅन्सर

वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे. हा कॅन्सर आता हाडांपर्यंत पसरला आहे. रविवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत विधानाद्वारे ही माहिती देण्यात आली. ८२ वर्षीय बायडेन यांना शुक्रवारी याची माहिती मिळाली. त्यांना लघवीसंबंधी काही तक्रारी होत्या. त्यानंतर कॅन्सरचे निदान करण्यात आले. त्यांचे कुटुंबीय आणि डॉक्टर यावेळेस संभाव्य उपचारांच्या पर्यांयाबद्दल विचार करत आहेत.


बायडेन यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा क२न्सर ग्लेसन स्कोर ९चा आहे. याचा अर्थ आक्रमक कॅन्सर आहे. कॅन्सर हाडांपर्यंत पसरला आहे. याला मेडिकल सायन्स भाषेत मेटास्टेसिस म्हणतात. मात्र यावर उपचार शक्य आहेत. दरम्यान, सध्या स्थिती गंभीर आहे. मात्र उपचाराचे पर्याय आहेत आणि बायडेन यांचे कुटुंबीय या पर्यायांवर विचार करत आहेत.


जो बायडेन २०२१ ते २०२५ पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये अचानक पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात त्यांची कामगिरी कमकुवत राहिली होती. या घटनेनंतर डेमोक्रेटिक पक्षामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना पक्षाने उमेदवारी दिली मात्र २०२४मध्ये ट्रम्प यांच्याविरुद्ध पराभव सहन करावा लागला.

Comments
Add Comment