Monday, May 19, 2025

महत्वाची बातमीनाशिक

Nasik Rain: वळवाच्या पावसाने नाशिकमध्ये हाहाकार! एकाचा मृत्यू तर एक जखमी, दोन हजार कोंबड्या देखील ठार

Nasik Rain: वळवाच्या पावसाने नाशिकमध्ये हाहाकार! एकाचा मृत्यू तर एक जखमी, दोन हजार कोंबड्या देखील ठार

मुसळधार पावसामुळे वीज पडून एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी


नाशिक: जिल्हयात सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध शहरात अनेक अपघात घडल्याचे वृत्त आहे. निफाड येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर नाशिक तालुक्यात जातेगाव येथे वीज पडल्यामुळे एक मुलगा जखमी झाला. ही आपघातांची मालिका इथेच संपली नाही तर, सप्तशृंगी गडावरुन येणाऱ्या गाडीवरती दगड पडल्यामुळे गाडीचे नुकसान झाले आहे. तसेच वडगाव पंगु येथील पोल्ट्री फार्म वरती वीज पडल्यामुळे दोन हजार कोंबड्यांचा नाहक जीव गेल्याची घटना घडली आहे.


गेले दोन दिवस नाशिकमध्ये वळवाच्या पाऊसाने कहर केला आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असून, अनेक ठिकाणी वीज पाडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यापूर्वी रविवार रात्री झालेल्या पावसाने नाशिकच्या अनेक मोठ्या शहरात पाणी भरले होते. ज्यात धुळे शासकीय विभागातील कार्यालयात देखील पाणी भरल्याची घटना घडली, ज्यामुळे अनेक महत्वाच्या फाईली भिजल्या. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही बेमोसमी पाऊसाने पुन्हा हजेरी लावत नाशिककरांची भंबेरी उडवली आहे.


निफाड तालुक्यातील मौजे सुखाने येथे शेतामध्ये काम करुन परत येणाऱ्या शेतकरी दीपक रंगनाथ राहणे वय वर्ष 40 याच्या अंगावरती वीज पडल्यामुळे तो मृत्यू झाला आहे . दिपक राहणे याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिथे मृत घोषित केले. तर नाशिक जिल्ह्यातील जातेगाव या ठिकाणी देखील पावसाची वीज कोसळल्यामुळे आदित्य राजाराम वळवे हा बारा वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याला तातडीने नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.


सुरू असलेल्या पावसामुळे सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीवरती अचानक दगड कोसळल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान नाशिकमध्ये अजून तीन दिवस हा वादळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हा वेधशाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे.
Comments
Add Comment