
खेड : महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट एमआयडीसीतील एका कारखान्याला आग लागली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील घटनेला २४ तास उलटले नाहीत तोच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोठी दुर्घटना घडली.
जगबुडी नदीच्या पुलावरुन एक कार कार शंभर फूट खाली कोसळली. कार थेट नदीत कोसळली. यामुळे कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. कारमधील सर्वजण मिरा रोड येथून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला. जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.