
सिंगापूरमध्ये चौदा हजारांपेक्षा जास्त तर चीनमधील हाँगकाँगमध्ये ८० पेक्षा जास्त वृद्ध कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. हाँगकाँगमध्ये कोरोनामुळे ३० वृद्धांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हाँगकाँगमध्ये कोविड अलर्ट जाहीर झाला आहे. वृद्धांना घरातच राहण्याचे आणि तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थायलंडमध्ये कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे.
भारत सरकारच्या डॅशबोर्डनुसार देशात २५७ कोविड अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आढळलेले कोविड रुग्ण उपचारांनी बरे होतील अशा स्थितीतले आहेत. सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल संघाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड यालाही कोरोना झाला आहे. तो सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार नाही. सध्या ट्रॅव्हिस हेडवर उपचार सुरू आहेत. ट्रॅव्हिस हेडने २०२५ च्या आयपीएलमध्ये ११ सामन्यांमध्ये २८.१० च्या सरासरीने आणि १५६.११ च्या स्ट्राईक रेटने २८१ धावा केल्या आहेत. या हंगामात त्याने दोन वेळा अर्धशतके केली आहेत. याआधी २०२४ मध्ये त्याने १५ सामन्यांत ४०.५० च्या सरासरीने आणि १९१.५५ च्या स्ट्राईक रेटने ५६७ धावा केल्या होत्या.
कोरोना संदर्भात बातम्या येऊ लागताच पुन्हा एकदा नागरिकांना लॉकडाऊनची चिंता सतावू लागली आहे. अद्याप सरकारने लॉकडाऊनची घोषणा केलेली नाही. नागरिकांनी घाबरू नये पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार करुन घेऊ नये आणि तब्येत बिघडल्यास मास्क घालून डॉक्टरांना भेटावे असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.