Thursday, August 14, 2025

हवाई दलाचा कर्मचारी बनून वावरणाऱ्या तरुणाला पुण्यात अटक

हवाई दलाचा कर्मचारी बनून वावरणाऱ्या तरुणाला पुण्यात अटक
पुणे :भारतीय हवाई दलाच्या जवानाच्या वेशात सोशल मीडियावर वावरून फसवणूक करणाऱ्या तरुणाला भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स, पुणे आणि पुणे शहरातील खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली. आरोपी गौरव दिनेश कुमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो खराडी येथील स्टे बर्ड हॉटेलमध्ये
कर्मचारी आहे.

हवाई दलाच्या वेशात त्याने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोच्या अानुषंगाने त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने एक वर्षांपूर्वी हवाई दलाचा गणवेश जाळून टाकल्याची कबुली दिली. पोलीस हवालदार रामदास पालवे यांनी आरोपी विरोधात फिर्याददाखल केली.

पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव कुमार याच्या भारतीय हवाई दलाच्या वेशातील संशयास्पद हालचालींबाबत गोपनीय माहिती लष्कराच्या गुप्तचर खात्यास मिळाल्यानंतर त्याच्यावर देखरेख ठेवण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान,आरोपीकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले काही साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये दोन हवाई दलाचे टी-शर्ट, एक हवाई दलाची कॉम्बॅट पँट, एक जोडी हवाई दलाचे कॉम्बॅट शूज, दोन हवाई दलाचे बॅजेस, एक ट्रक सूट यांचा समावेश असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. पुणे पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिताच्या कलम १६८ अंतर्गत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >