
मुंबई: मुंबईच्या मालवणी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथे ३० वर्षीय महिला आणि तिच्या १९ वर्षीय बॉयफ्रेंडने अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखील आरोपींविरुदध भारतीय दंड विधानाच्या कलम ७०, ६४, ६५(२), ६६, १०३, २३८, ३(५)सोबतच पॉक्सो कायद्याच्या कलम ६, १० आणि २१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा या पीडित मुलीला मुंबईच्या मालवण जनकल्याण नगरातील एका सरकारी रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. येथे डॉक्टरांनी तपासानंतर तिला मृत घोषित केले. मात्र मेडिकल तपासणीदरम्यान मुलीच्या खाजगी पार्टला दुखापत झाली होती. यानंतर रुग्णालया प्रशासनाने पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांच्या तपासादरम्यान, या मुलीच्या आईचे संबंध १९ वर्षीय एका मुलाशी असल्याचे आढळले. तसेच या आरोपी महिलेचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यावेळेस ती प्रेग्नंट होती. घटस्फोटानंतर त्या महिलेने मुलीला जन्म दिला होता. या दरम्यान आरोपी मुलासोबत तिचे प्रेमसंबंध झाले. ती आपल्या आईच्या घरी राहत होती. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या रात्री आरोपीने आरोपी आईच्या समोरच मुलीवर बलात्कार केला.
पीडित चिमुरडी ही रडत होती. मात्र तिची आई तिला वाचवायला आली नाही. आईचे काळीज म्हणावे की काय...मुलीची स्थिती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात नेले मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपी महिलेने पोलिसांना यावेळी गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध केस दाखल करत अटक केली.