
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी सनरायजर्स हैदराबादचा सामना लखनऊ सुपरजायंट्ससोबत आहे. मात्र त्याआधी हैदराबादला मोठा झटका बसला आहे. कारण त्यांचा स्टार ओपनर ट्रेविस हेड कोरोना १९ पॉझिटिव्ह आढळला आहे. या कारणामुळे तो लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात भाग घेऊ शकणार नाही. हैदराबादचा मुख्य कोच डेनियम व्हिटोरीने याबाबतचा दुजोरा दिला आहे. हेडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तो संघासोबत प्रवास करू शकत नाही.
व्हिटोरीने म्हटले, त्याला कोविड १९ झाला होता आणि दुर्देवाने तो प्रवास करू शकला नाही. आम्ही आशा करतो की पुढील सामन्यासाठी तो पूर्णपणे ठीक होऊन संघात सामील होईल. सनरायजर्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे आणि आता उरलेल्या सामन्यांता ते सन्मानासाठी लढाई लढणार आहेत.
ट्रेविस हेडच्या अनुपस्थितीत हैदराबाद संघात मोठी कमतरता भासेल. कारण तो संघाचा प्रमुख फलंदाज आहे. त्याची आक्रमक शैली संघाला मजबूत सुरूवात करून देण्यास सहाय्यक ठरेल.