
शाहरुख खान आणि राणी मुखर्जी १९ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसणार आहे. राणी मुखर्जी शाहरुखच्या 'किंग' चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात तिची छोटीशी भूमिका आहे. अभिनेत्रीने तिच्या भूमिकेसाठी पाच दिवस चित्रीकरणही केले आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, राणी मुखर्जी चित्रपटात सुहाना खानच्या आईची भूमिका साकारणार आहे.