
पंजाबच्या गोलंदाजीचा भार अर्शदीप सिंह व फिरकी मास्टर युजवेंद्र पहलवर असेल. पंजाबसाठी जमेची बाजू म्हणजे महल मेले तीन हंगाम राजस्थानसाठी खेळत होता. त्याचा अनुभव पंजाबसाठी खूप महत्वाचा आहे. आजचा सामना राजस्थानच्या सवाई मानसिंग मैदानावर होणार आहे. राजस्थानची फलंदाजी कमकुवत असल्यामुळे पंजाबचे ध्येय असेल की, २० षटकात २००-२२० धावांचे लक्ष्य राजस्थान समोर ठेवणे, तसेच पंजाबने राजस्थानला हलक्यात घेऊन चालणार नाही, हा संघ मोक्याच्या क्षणी बाजी मारून जातो.
गुजरात विरुद्ध वैभव सूर्यवंशीने याच मैदानावर शतक ठोकून राजस्थानला विजय मिळवून दिला होता. राजस्थान पात्रता फेरीतून बाहेर गेले आहे तरीपण ते पंजाबला सहज विजय मिळवून देणार नाहीत. रॉयल्सचा स्टार गोलंदाज जॉफा आर्चर खेळणार नसून त्याची जागा कोण भरून काढेल यावर सगळ्यांचेच लक्ष असणार आहे. चला तर बघूया पंजाब दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा पात्रता फेरीत जाईल का?