Saturday, May 17, 2025

कोलाज

काव्यरंग

काव्यरंग

गीत : संत ज्ञानेश्वर
स्वर : लता मंगेशकर, रामदास कामत




 

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा...
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥

चरणकमळदळू रे भ्रमरा ।
भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥

सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥

सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा ।
बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥

 

गीत : जगदीश खेबूडकर
स्वर : अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर




राजा ललकारी अशी घे
राजा ललकारी अशी घे
हाक दिली, साद मला दे

कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटंवाणी मन भरून गेलंया
ओढ फुलाला वाऱ्याची, जशी खूण इशाऱ्याची
माझ्या सजणाला कळू दे

सूर भेटला सूराला, गाणं आलं तालावर
खुळ्या आनंदाचं माझ्या हासू तुझ्या गालावर
भरजरीचा हिरवा शेला पांघरून नवा
शिवार हे सारं खुलू दे

थेंब न्हवं हे घामाचं, त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा, लई मायाळू ही माती
न्याहारीच्या वखुताला, घडीभर इसाव्याला
सावली ही संग मिळू दे
Comments
Add Comment