काव्यकोडी

एकनाथ आव्हाड


डोंबाऱ्याचा खेळ
आज या गावाला,
तर उद्या त्या गावाला
डोंबाऱ्याचा खेळ आला
चला जाऊ पाहायला


ढोलकीचा आवाज
कानावर जेव्हा पडतो
छोटासा पोरगा
दोरीवर मग चढतो


छान धरतो ठेका
तो ढोलकीच्या तालावर
रस्त्यावर चालावे तसा
सहज चाले दोरीवर


केवढे थरारक खेळ
नवे नवे तो दाखवतो
अंगावर येतो काटा
थरकाप जिवाचा उडतो


पोटाची खळगी भरण्या
होई जिवावर उदार
चार पैसे मिळवून
उचले कुटुंबाचा भार


जगण्यासाठी गावोगावी
नाचतो हा डोंबारी
डोंबाऱ्यांच्या पोराला आता
शाळाच देतेय उभारी



१) हात नाही, पाय नाही
लांबीने छोटा-मोठा
त्याला पाहताच अंगावर
सरसरून येतो काटा


शेतकऱ्यांच्या मित्राचे
एक नाव भुजंग
नागमोडी आकारात
कोण सरपटतो सांग?


२) स्वभावाने भित्रा
पळण्यात चपळ
शत्रू दिसताच
लगेच काढे पळ


दिसायला सुंदर
जंगलात दिसती फार
सांबर, चितळ
हे कोणाचे प्रकार?


३) बगळ्यासारखे
रूप त्याचे असे
पाणथळ जागेत तो
फिरताना दिसे


लांब मान, लांब पाय
चोच देखील लांब
कोणता हा पक्षी
नाव त्याचं सांग?



उत्तर -
१) साप
२) हरीण
३) करकोचा

Comments
Add Comment

खरे धाडस

कथा : रमेश तांबे पावसाळ्याचे दिवस होते. भरपूर पाऊस पडत होता. ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सारे जंगल

बोलल्याप्रमाणे वागावे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर “माणसाला त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतीवरून ओळखले जाते” असे आपण

मनाचा मोठेपणा

कथा : रमेश तांबे शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्याधरने नेहमीप्रमाणे आपले नाव स्पर्धेसाठी दिले होते.

सहकार्य

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यने आधीपासूनच सुभाषला काहीतरी मदत करण्याचा आपल्या मनाशी ठाम निश्चय केलेला होताच.

प्रार्थना

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला-क्रीडा अशा संस्थांमध्ये

फुलासंगे मातीस वास लागे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणसाच्या आयुष्यात संगतीचे महत्त्व फार मोठे असते. एखाद्या व्यक्तीचा