
श्रीहरिकोटा: इस्त्रोने आज आणखी एक नवा इतिहास रचला आहे. श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून पीएसएलव्ही सी ६१च्या माध्यमातून आपला १०१वा सॅटेलाईट लाँच केला आहे. याची खासियत म्हणजे हे सॅटेलाईट प्रत्येक मोसमात आणि दिवस रात्र पृथ्वीची हाय रिझोल्युशन फोटो घेणार आहे.
हे रॉकेट EOS-09 ला सूर्य समकालिक कक्षात घेऊन गेला. सी बँड सिंथेटिक अपर्चर रडारने परिपूर्ण EOS-09 हे कोणत्याही मोसमात कोणत्याही वेळेस पृथ्वीच्या पृष्ठभागावर उच्च रिझोल्युशनवाले फोटो घेण्यास सक्षम आहे.
इस्रोच्या नियोजनानुसार रविवार १८ मे रोजी सकाळी पाच वाजून ५९ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही - सी ६१ रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले.
🚀 LIFTOFF!
ISRO’s 101st launch mission takes flight aboard PSLV-C61
📺 Watch Live Streamhttps://t.co/JTNzdc1own
More information: https://t.co/cIrVUJxKJx#ISRO #ISRO101
— ISRO (@isro) May 18, 2025
स्रोचा EOS-09 हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. हा उपग्रह कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही परिस्थितीत भारताच्या देखरेखीच्या क्षमतेत वाढ करणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. हा उपग्रह सी-बँड सिंथेटिक अॅपार्चर रडारने सुसज्ज आहे ज्यामुळे कोणत्याही वातावरणात २४ तास उच्च क्षमतेचे अर्थात हाय रिझोल्युशनचे फोटो घेणे या उपग्रहाला शक्य आहे.