Sunday, May 18, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

IIT Bombay Boycott Turkey: आता आयआयटी मुंबईने टाकला तुर्कीवर बहिष्कार, विद्यापीठांसोबतचा सामंजस्य करार रद्द

IIT Bombay Boycott Turkey: आता आयआयटी मुंबईने टाकला तुर्कीवर बहिष्कार, विद्यापीठांसोबतचा सामंजस्य करार रद्द

मुंबई: भारतात तुर्कीविरुद्ध निदर्शनाची मालिका सुरूच आहेत. देशात प्रत्येक तुर्की वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे. तुर्कीला भारतातून संगमरवरी आणि सफरचंदांचा व्यापार थांबवण्याच्या घोषणेनंतर, देशातील अनेक मोठ्या संस्थांनीही तुर्कीसोबतचे त्यांचे करार रद्द केले आहेत. या यादीत आयआयटी मुंबई (IIT Bombay) देखील सामील झाले आहे. आयआयटी मुंबईनेही तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले आहेत.


तुर्की आणि भारत यांच्यातील सध्याची भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटी मुंबईने म्हटले आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत तुर्कीसोबतचे शैक्षणिक सहकार्य स्थगित राहील.



तुर्कीसोबतचे शैक्षणिक सहकार्य स्थगित 


आयआयटी मुंबईने विद्यार्थी आणि प्राध्यापकांना तुर्कीशी संबंधित कोणत्याही देवाणघेवाण किंवा संशोधन कार्यक्रमांबाबत अधिकृत माहितीला स्थगिती देण्यास सांगितले आहे. यापूर्वी आयआयटी रुरकी, जेएनयू आणि जामिया मिलिया इस्लामिया सारख्या संस्थांनीही तुर्की संस्थांसोबतचे सहकार्य संपवले आहे. देशाच्या सुरक्षेला आणि हितांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे आयआयटी मुंबईच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तुर्कीवर पाकिस्तानला लष्करी मदत केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे भारतभर त्याविरुद्ध निदर्शने होत असून,  या पार्श्वभूमीवर "बहिष्कार तुर्किए" (Boycott Turkey) मोहिम देशभरात राबवली जात आहे.



जेएनयू, (JNU), जामिया आणि आयआयटी रुरकी यांनीही सामंजस्य करार केला रद्द 


जेएनयूने तुर्कीच्या इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार (MoU) स्थगित केला आहे. त्याच वेळी, जामिया मिलिया इस्लामियानेही राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत तुर्की संस्थांसोबतचे सर्व प्रकारचे सहकार्य थांबवण्याची घोषणा केली आहे. तसेच आयआयटी रुरकीने तुर्कीतील इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार औपचारिकपणे रद्द केला आहे.

Comments
Add Comment