
अपवादात्मक परिस्थितीत दंड शिथिलतेची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आर.टी. ओ.ने घालून दिलेली ताशी ८० किलो मिटर व घाट सेक्शन मध्ये ताशी ४० किलोमीटरची वेग मांदा ओलांडल्या बद्दल बऱ्याच एसटी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून आता पर्यंत लाखो रुपयांच्या दंडाच्या रक्कमेची वसुली सदर वाहन चालविणाऱ्या चालकाच्या पगारातून करण्यात आली आहे.
विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना ठरवून दिलेल्या वेळेत उचित स्थळी पोहोचविण्यासाठी किंवा रस्त्यातील वाढलेल्या वाहतुकीचा विचार करून वेग मर्यादा किंचित वाढल्यास एसटी ही सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी संस्था असल्याने एसटीच्या वाहनाला दंडाच्या रक्कमेत शिथिलता देण्यात यावी. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी करत आहे.
आता पर्यंत ६ कोटी पेक्षा जास्त दंड आरटीओकडून वसूल करण्यात आला आहे. ठाणे विभागाकडून ८० लाख रुपये दंड वसूल केला आहे. कुठे व किती रुपये दंड वेग मर्यादा तोडली, तर ४००० रुपये लेन कटिंग १००० रुपये सिग्नल जप ५०० रुपये गर्दीच्या ठिकाणी गाडी थांबविल्यास १००० ते १५०० रुपये स्टॉप शिवाय इतर ठिकाणी गाडी थांबविल्यास १००० ते १५०० रुपये