नालेसफाईची कामे 'फास्ट ट्रॅक' वर

मध्य रेल्वेची ७५, तर पश्चिम रेल्वेची ८० टक्के सफाई पूर्ण


मुंबई (प्रतिनिधी) : यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नालेसफाईला गती दिली आहे. मध्य रेल्वेने आतापर्यंत ७५ टक्के, तर पश्चिम रेल्वेने ८० टक्के नालेसफाई पूर्ण केली आहे. ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


मुंबईसह राज्यात ३१ मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. पावसाळ्पात रुळांमध्ये पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा होक नये, यासाठी नालेसफाई होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने रुळांलगत असलेली गटारे, नाले स्वच्छ असणे आणि त्यातून पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेच्या निधीतून रेल्वे प्रशासन ही कामे करीत आहे.



मायक्रो टनेलिंगचे काम मार्गी


एप्रिलपासून सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामात मध्य रेल्वेने आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण केले आहे. सायन-कुर्ला, विक्रोळी घाटकोपर सँडहर्स्ट रोडजवळ या माध्यमातून पाणी थेट महापालिकेच्या मुख्य नाल्यात सोडले जाणार आहे. पाशिवाय कुर्ता-चुनाभट्टीदरम्यान हार्बर मार्गावर पाणी साचण्याच्या समस्येवर रुळांची उंची वाढविण्यात आली आहे.


नालेसफाईसह पाणी साचू नये, यासाठी रुळालगतच्या उपाययोजना जवळपास पूर्ण झाल्या आहेत. मान्सूनपूर्व तयारी अंतिम टप्यात आहे. कचरा न टाकण्यासाठी जनजागृतीही सुरू आहे. - डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी,


मध्य रेल्वे गेल्या वर्षीप्रमाणे उपाययोजना राबविण्यात येत आहेत, स्थानिक महापालिकांसोबत समन्वय ठेवत पूरप्रवण भागात वॉटर लेव्हल मॉनिटरिंग यंत्रे बसविली आहेत. तुळशी, विहार, पवई नद्यांची तपासणीदेखील पूर्ण झाली आहे. विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Comments
Add Comment

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील