Sunday, May 18, 2025

क्रीडाIPL 2025महत्वाची बातमी

DC vs GT, IPL 2025: सुदर्शन-गिलच्या धावांचे वादळ, गुजरातचा दिल्लीवर १० विकेट राखून विजय

DC vs GT, IPL 2025: सुदर्शन-गिलच्या धावांचे वादळ, गुजरातचा दिल्लीवर १० विकेट राखून विजय

दिल्ली: गुजरातच्या साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी केलेल्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर गुजरातने दिल्लीला १० विकेट राखत हरवले आहे. दिल्लीने विजयासाठी दिलेले २०० धावांचे आव्हान दिल्लीने एकही विकेट न गमावता आणि ६ बॉल राखत पूर्ण केले. या विजयासह गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.


याआधी केएल राहुलने ठोकलेल्या जबरदस्त शतकाच्या जोरावर आयपीएल २०२५मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीकडून लोकेश राहुलने ११२ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या जोरावर दिल्लीला २० षटकांत ३ बाद १९९ धावा करता आल्या होत्या.



अशी होती गुजरातची फलंदाजी


२०० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातची सुरूवात जबरदस्त राहिली. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरूवात केली. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस केला. साई सुदर्शनने जबरदस्त शतक ठोकले. त्याला शुभमन गिलनेही चांगली साथ दिली. २०व्या षटकापर्यंत दिल्लीला गुजरातची विकेट काढता आली नाही.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या दिल्लीची सुरूवात चांगली झाली नाही. केएल राहुल आणि फाफने मंद सुरूवात करून दिली. मात्र चौथ्याच षटकात दिल्लीला फाफ डू प्लेसिसच्या रूपात झटका बसला. अर्शद खानने ही विकेट मिळवली. मात्र यानंतर केएल राहुलने धैर्य दाखवले आणि दिल्लीचा डाव सांभाळला. दुसरीकडे अभिषेक पोरेलनेही त्याला साथ दिली. केएल राहुलने ३५ चेंडूत अर्धशतक ठोकले. १२व्या षटकांत दिल्लीला दुसरा झटका बसला तो अभिषेक पोरेलच्या रूपात. त्याने १९ बॉलमध्ये ३० धावा ठोकल्या. मात्र दुसऱ्या बाजूला लोकेश राहुल शेवटपर्यंत टिकून होता. १७व्या षटकांत अक्षऱ पटेलची विकेट पडली. अक्षरने १६ बॉलमध्ये २५ धावा केल्या. मात्र केएल राहुलची जबरदस्त फलंदाजी सुरूच होती. अखेरीस दिल्लीने २० षटकांत १९९ धावा केल्या.


Comments
Add Comment