
ठाणे : शहराच्या फक्त काही किलोमीटर अंतरावर असलेली ठाणे-ऐरोली-भांडुप खाडी दरवर्षी हिवाळा संपता संपता एक अत्यंत सुंदर आणि दुर्मीळ निसर्गचित्र साकारते. यात हजारो गुलाबी फ्लेमिंगो पक्ष्यांची गर्दी दिसून येते. हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास करून स्थलांतरित पक्ष्यांचे हे थवे या परिसरात दाखल होतात. त्यांच्या आगमनाने निसर्गाची समृद्धता उजळते, परंतु या दृश्याकडे स्थानिक लोक, शाळा, पर्यटक आणि प्रशासन मात्र फारसे लक्ष देताना दिसत नाहीत.

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी पट्ट्यात व मुरबाड शहर परिसरात ६ मे २०२५ पासून ते १६ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसत आहे. ...
ऐरोली खाडी परिसरात उभारलेली ‘फ्लेमिंगो सेंच्युरी’ ही जागतिक दर्जाची सुविधा जर्मन सरकारच्या सहकार्याने उभी राहिलेली आहे. येथे बोट सफारीद्वारे पर्यटक ७–१० किलोमीटर अंतरावर खाडीत फिरून पक्षांचे निरीक्षण करू शकतात. सेंच्युरीतील माहिती दालनामध्ये फ्लेमिंगो, किंगफिशर, व्हेल, शार्क मासा अशा विविध प्राण्यांविषयी माहिती मिळते, त्यांचे आवाजही ऐकता येतात. बोट सफारी दररोज फक्त १ ते ४ वेळा होते आणि पर्यटकांअभावी ती अनेकदा रद्द केली जाते. रविवारी थोडी वर्दळ असली तरी आठवड्याभरात ठिकठिकाणी शांतता पसरलेली असते. फ्लेमिंगो व्यतिरिक्त, ब्लॅक ड्रोंगो, ब्राह्मणी स्टार्लिंग, किंगफिशर, ग्रे हेरॉन, ब्राह्मणी घार, ग्रीन व्हार्बलर असे अनेक स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी खाडी परिसरात आढळतात. सागरी वनस्पती, मासे, कासव आणि जलचर प्राण्यांचा संपूर्ण परिसंस्था येथे कार्यरत आहे.
फ्लेमिंगो हे फक्त सुंदरच नाहीत, तर पर्यावरणाच्या आरोग्याचे संकेतही आहेत. त्यांचे थवे पाणथळ जागांमध्ये, खाडीच्या काठावर, आणि खारफुटीच्या परिसरात झुडुपांमध्ये दिसतात. त्यांची सामूहिक उड्डाणे, पाण्यावर उमटणारी प्रतिबिंबे – हे पाहणे म्हणजे एक अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक अनुभव आहे. परंतु, अनेकदा या दृश्याचा आनंद घेणारे केवळ पक्षीप्रेमी, वन्यजीव छायाचित्रकार किंवा थोडेफार पर्यावरणप्रेमी असतात. स्थानिक नागरिक, शाळा-महाविद्यालये आणि पर्यटकांचा सहभाग अत्यल्प आहे. खरं तर शहराच्या इतक्या जवळ निसर्गाचा असा कोपरा आहे, हे अनेकांना माहीतही नाही.