
काही महिन्यांपूर्वीच एनआयएने अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. दोन्ही आरोपींची ठोस माहिती देणाऱ्यास तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
एनआयएने पुण्यातील २०२३ च्या आयईडी प्रकरणात आधीच आयएसआयएसशी संबंधित आठ जणांना अटक केली आहे. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अटकेतील सर्व आरोपींवर देशात शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. हिंसाचार व दहशतीच्या मार्गाने भारत सरकारविरोधात युद्ध पुकारून देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप आरोपींवर आहे.
अब्दुल्ला फैयाज शेख याने पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घेतलेल्या घरात स्फोटके तयार केली होती. ही स्फोटके तयार करण्यासाठी त्याने २०२२ - २३ मध्ये प्रशिक्षण घेतले होते. पुण्यात तयार केलेल्या स्फोटकांची फैयाज शेख याने चाचणीही केली होती.
एनआयएने मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनुस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसीरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदवाला, शामील नाचन, आकिफ नाचन, शहनवाज आलमया आरोपींविरुद्ध यूएपीए, स्फोटके अधिनियम, शस्त्र अधिनियम आणि भारतीय दंड विधानच्या विविध कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले आहे.