Friday, May 16, 2025

विशेष लेख

हवाई संरक्षणाचा केंद्रबिंदू : आकाशतीर

हवाई संरक्षणाचा केंद्रबिंदू : आकाशतीर

भारत-पाकिस्तानमधील विविध मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ८ तळांसह १३ लक्ष्यांवर इतक्या अचूकपणे मारा कसा करू शकला? पाकिस्तानचा पूर्णपणे धुव्वा कसा उडाला? असे प्रश्न जगभरातील तज्ज्ञांना पडले असून ते आश्चर्यचकित झाले आहेत. ९ आणि १० मे दरम्यानच्या रात्री, जेव्हा पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने भारतीय लष्करी आणि नागरी क्षेत्रांवर सर्वात मोठे हल्ले केले, तेव्हा अभेद्य, भारतीय स्वसंरक्षण भिंतीने ते पूर्णपणे विफल केले. या भिंतीचे नाव - आकाशतीर .


या आकाशतीर प्रणालीनेच पाकिस्तानी हवाई ड्रोन, क्षेपणास्त्रे, इतर छोटी UAV म्हणजे मानवविरहित हवाई वाहने आणि हवेतल्या इतर शस्त्रास्त्रांना नेस्तनाबूत केले आणि त्यांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखले. आकाशतीर पूर्णपणे स्वदेशी उत्पादन असून आत्मनिर्भर भारताची क्षमता यातून प्रतिबिंबित झाली आहे. आकाशतीरच्या तुलनेत, पाकिस्तानची सुरक्षा प्रतिसाद प्रणाली वेळेवर प्रक्षेपास्त्र शोधण्यात आणि भेदण्यात पूर्णपणे अपयशी ठरली. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानच्या सुरक्षा प्रतिसाद कवचामध्ये HQ-९ आणि HQ-१६ यांचा समावेश होता. 'आकाशतीर', पूर्णपणे स्वयंचलित संरक्षण प्रणाली असून रिअल-टाइम लक्ष्य तिने अडवली आणि ड्रोन युद्धप्रकारात ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.


आकाशतीर सर्व संबंधितांना (नियंत्रण कक्ष, रडार आणि हवाई संरक्षण मारकांना) सामायिक रिअल टाइम चित्र पुरवते, जेणेकरून समन्वित हवाई कारवाया सक्षम होतात. शत्रूची विमाने, ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे आपणहून शोधणे, त्याचा माग राखणे यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. विविध रडार यंत्रणा, सेन्सर्स आणि वेगवेगळ्या कम्युनिकेशन टेक्नालॉजीज एकाच संचालन चौकटीत या प्रणालीद्वारे जोडण्यात आल्या आहेत. आकाशतीर अनेक स्त्रोतांकडून डेटा गोळा करते, त्यावर प्रक्रिया करते आणि स्वयंचलित, वास्तविक वेळेतल्या स्थितीनुसार निर्णय घेणे शक्य करते. आकाशतीर हे विस्तृत C4ISR (कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन्स, कंप्यूटर, इंटेलिजेंस, सर्व्हेलन्स आणि रिकौनीसन्स) चौकटीचा भाग आहे, जी इतर प्रणालींशी समन्वय साधून काम करते.


आकाशतीरची खुबी बुद्धिमत्ता आधारित युद्धतंत्रात आहे. हवाई संरक्षणाची पारंपरिक प्रारूपे मुख्यत्वेकरून जमिनीवर स्थित रडार्स, मानवी देखरेख यंत्रणा आणि कमांड साखळ्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र संचांवर अवलंबून असतात. आकाशतीर या चौकटीपलीकडील आहे. तिचे तंत्र युद्धक्षेत्रात कमी पातळीवरील हवाई क्षेत्राचे निरीक्षण आणि जमिनीवर आधारित हवाई संरक्षण शस्त्र प्रणालींचे कार्यक्षम नियंत्रण शक्य करते. आपल्या रणनीती सिद्धांतामधला नवा अध्याय आकाशतीर आहे. बचावात्मक दृष्टिकोन मागे टाकून दहशतवादी धोक्यांना सक्रिय प्रत्युत्तर असा बदल तिने घडवून आणला आहे. पाकिस्तानने भारताला अण्वस्त्रांच्या धमक्या देऊ नयेत, भारत ते सहन करणार नाही आणि पाकिस्तानच्या भूमीत पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाला भारत चोख प्रत्युत्तर देईल, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे.


आपल्या लष्करी साठ्यात आकशतीरचा समावेश आपला आत्मविश्वास वाढवणारा आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध हवाई संरक्षण सिद्धता आकाशतीर पुरवते. जगभरातले तज्ज्ञ आता आकाशतीरला 'युद्ध रणनीतीतला भूकंपीय बदल' म्हणून संबोधत आहेत. आकाशतीरमुळे भारत पूर्णपणे स्वयंचलित आणि एकात्मिक एडी सी अँड आर (म्हणजे हवाई संरक्षण नियंत्रण आणि हवाई धोके ओळखून त्याची माहिती देण, अशी) क्षमता प्राप्त केलेल्या प्रतिष्ठित राष्ट्रांच्या पंक्तीत विराजमान झाला आहे. थोडक्यात सांगायचे, तर आकाशतीरने हे दाखवून दिले आहे की, ती जगाने वापरलेल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा वेगाने पाहते, निर्णय घेते आणि प्रहार करते. ही प्रणाली वाहन आधारित आहे त्यामुळे तिचे वहन शक्य आहे आणि प्रतिकूल वातावरणात हाताळण्यास ती सुलभ आहे. या प्रणालीत अशा वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे आपल्याच बाजूवर चुकून मारा केल्या जाण्याच्या शक्यता कमी होतात, शत्रूला त्वरित प्रत्युत्तर दिले जाते. एकात्मिक सेन्सर्समध्ये टॅक्टिकल कंट्रोल रडार रिपोर्टर, थ्रीडी टॅक्टिकल कंट्रोल रडार्स, लो-लेव्हल लाइटवेट रडार आणि आकाश अस्त्र प्रणाली असलेल्या रडारचा समावेश आहे.


आकाशतीरमधला सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्हणजे हवामान, भूप्रदेश, रडार इंटरसेप्ट्स अशा बहुविध घटकांकडून डेटा संकलित करण्याची आणि रिअल-टाइम निर्णय घेण्यापासून, मोहिमांना पुनर्निर्देशित करणे आणि स्वयंचलित हल्ला करण्यापर्यंतची तिची बहुविध क्षमता. 'हे आम्ही पूर्वी पाहिले आहे त्या कित्येकपट पलीकडले आहे,' अशी प्रतिक्रिया अनेक पाकिस्तानी संरक्षण तज्ज्ञांची आहे. जगभरातूनदेखील अशाच प्रतिक्रिया येत आहेत. आकाशतीर लष्करी हवाई संरक्षणाच्या (AAD)च्या सर्वात कमी ऑपरेशनल युनिट्सना अखंड आणि एकीकृत हवाई चित्र पुरवते, जे संपूर्ण सैन्यात समन्वय आणि परिस्थितीजन्य जागरूकता वाढवते. आकाशतीर मानवी हस्तक्षेप आणि विकेंद्रीकरण टाळून स्वयंचलन आणि कार्यक्षमता देखील वाढवते.


भारतीय हवाई दल (IACCS), भारतीय नौदल (TRIGUN) आणि भारतीय लष्कराच्या (AKASHTEER)च्या एडी सी अँड आर नेटवर्कच्या एकात्मिकतेमुळे युद्धभूमीची स्थिती स्पष्ट होण्यात क्रांतिकारी बदल घडला आहे आणि गतिज आणि बिगर-गतिज भू आधारित हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीचा समन्वित वापर सुनिश्चित झाला आहे.
(पत्र सूचना कार्यालय )

Comments
Add Comment