
सर्वोत्तम कामगिरी करणारी महामंडळे
१) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण - ८२.१६ गुण
२) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित - ७७.१९ गुण
३) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण - ७६.०२ गुण
४) महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण - ६६.३७ गुण
५) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - ६५.१४ गुण
मुंबई : राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे मूल्यमापन शुक्रवार, दि. १६ मे रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत संकेतस्थळात सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमात शासनाच्या अखत्यारीतील सर्व ९५ महामंडळांनी सहभाग घेऊन अभूतपूर्व कामगिरी केली. यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ८२.१६ गुण पटकावून पहिला क्रमांक पटकावला आहे.